Pages

भारतीय प्रशासकीय सेवा- पूर्वपरीक्षा- २०१५

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवा- पूर्वपरीक्षा- २०१५ या राष्ट्रीय स्तरावरील पात्रता परीक्षेची अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.
जागांचा तपशील : या स्पर्धा परीक्षेद्वारा केंद्र सरकारच्या विविध सेवा आणि आस्थापनांमध्ये १,१२९ जागा भरण्यात येणार असून त्यापैकी काही जागा सरकारी नियमांनुसार राखीव आहेत.
शैक्षणिक पात्रता : कुठल्याही विषयातील पदवीधर .
वयोमर्यादा : उमेदवारांचे वय २१ ते ३२ वर्षांच्या दरम्यान असावे. वयोमर्यादेची अट राखीव गटातील उमेदवारांसाठी सरकारी नियमांनुसार शिथिलक्षम आहे.
निवड प्रक्रिया : अर्जदारांपैकी पात्र उमेदवारांना पूर्वपरीक्षा देता येईल. ही निवड परीक्षा २३ ऑगस्ट २०१५ रोजी देशांतर्गत निवडक परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. त्यामध्ये राज्यातील मुंबई, नागपूर, पुणे, औरंगाबाद व ठाणे या परीक्षा केंद्रांचा समावेश असेल.
प्राथमिक प्रशासन सेवेत निर्धारित गुणांक मिळविणाऱ्या उमेदवारांना आयोगातर्फे मुख्य निवड परीक्षेला बोलाविण्यात येईल. त्यात यशस्वी ठरलेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत व वैद्यकीय तपासणीच्या आधारे अंतिम निवड करण्यात येईल.
अर्जासह भरायचे शुल्क : अर्जासह भरायचे शुल्क म्हणून १०० रु. रोखीने स्टेट बँक ऑफ इंडिया अथवा तिच्या सहयोगी बँकेच्या कुठल्याही शाखेत भरावेत.
अधिक माहिती: 'एम्प्लॉयमेंट न्यूज'च्या २३ ते २९ मे २०१५च्या अंकात प्रकाशित झालेली केंद्रीय लोकसेवा आयोगाची जाहिरात पाहावी अथवा www.upsc.gov.in संकेतस्थळाला भेट द्यावी. संगणकीय पद्धतीने आयोगाच्या www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर १९ जून २०१५ पर्यंत अर्ज करता येतील.#yogeshp.com

No comments:

Post a Comment

 

Most Reading

Sidebar One