विधान परिषद
निवडणुकीत मतदान करण्यासाठी ५० लाखांची लाच देताना भ्रष्टाचार विरोधी पथकाने
तेलुगु देसम पक्षाचे (टीडीपी) आमदार असलेल्या कोणत्या नेत्यास अटक केली?
== ए. रेवनाथ रेड्डी http://yogeshp.com
=>तेलंगणा विधान
परिषदेच्या निवडणुकीत टीडीपीच्या उमेदवारास मतदान करावे यासाठी रेड्डी यांनी
अँगो-इंडियन आमदार एल्विस स्टिफन्सन यांना लाच देऊ केली होती.
=>रेड्डी यांनी
स्टिफन्सन यांना पाच कोटींची ऑफर दिली होती. ५० लाख हे मतदानापूर्वी आणि उरलेले
साडेचार कोटी मतदानानंतर देणार होते
२७व्यांदा कोपा
डेल रे फुटबॉल स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली?
== बार्सिलोना
=>कँप नोऊमध्ये
झालेल्या अंतिम लढतीत अॅ थ्लेटिक बिल्बाओचा ३-१ असा पराभव करत बार्सिलोनाने
२७व्यांदा कोपा डेल रे फुटबॉल स्पर्धा जिंकली.
=> प्रशिक्षक:- लुईस
एन्रिक्स
०३)बॉलिवूडची
पहिली ‘क्वीन’ आणि ‘मदर इंडिया’ म्हणून ओळखल्या
जाणार्या बॉलिवूडमधील कोणत्या सुप्रसिद्ध दिवंगत अभिनेत्रीच्या ८६व्या
जयंतीनिमित्त गुगलने डुडलच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहिली आहे?http://yogeshp.com
== नर्गिस दत्त
=>नर्गिस यांचे ०३
मे १९८१ रोजी वयाच्या ८१ व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले.
=>सरकारतर्फे
मानाचा पद्यश्री पुरस्कार मिळालेल्या नर्गिस दत्त या पहिल्या अभिनेत्री आहेत.
=>पहिल्या
अभिनेत्री होत्या ज्यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्रींच्या श्रेणीमध्ये राष्ट्रीय फिल्म
पुरस्कार मिळाला.
=>दरवर्षी होणा-या
राष्ट्रीय फिल्म पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय एकतेवर बनलेल्या सर्वश्रेष्ठ सिनेमाला ‘द नर्गिस
दत्त अवॉर्ड‘ दिला जातो.
=>नर्गिस दत्त १९८०
मध्ये राज्यसभेच्या खासदार झाल्या होत्या.
=>‘तलाश-ए-इश्क’
या सिनेमातून १९३५ साली नर्गिस यांनी बालकलाकार
म्हणून हिंदी सिनेसृष्टीत पहिलं पाऊल ठेवले होते.
०५) संयुक्त
राष्ट्रसंघाच्या अन्न आणि कृषी संघटनेचा प्रसिद्ध झालेला अहवालानुसार देशातले किती
कोटी लोक उपाशी आहेत?
== १९ कोटी
=>ही संख्या १९
कोटी आहे. म्हणजे युरोपमधील किमान १० राष्ट्रांच्या लोकसंख्येएवढी ही संख्या आहे.
०६) बेकायदा
बाळगलेले प्राणी, पक्षी पोलिसांनी
ताब्यात घेतल्यानंतर त्यांना अमानवी वागणूक मिळू नये, त्यांची व्यवस्थित सांभाळण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे
निश्चित करावीत अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे सुप्रीम कोर्टाने
मान्य केले आहे.ही याचिका कोणत्या संस्थेने मांडली होती?
== पेट लव्हर्स
असोसिएशन
=>न्या. ए. के.
सिकरी आणि न्या. यू. यू. ललित यांच्या सुट्टीतील खंडपीठापुढे 'पेट लव्हर्स असोसिएशन' या संस्थेने ही याचिका सादर केली होती.
=>संस्थेतर्फे
ज्येष्ठ विधिज्ञ व माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांनी अन्य याचिकाकर्त्यांसह
संस्थेची बाजू मांडली.
=>संस्थेने गुजरात
हायकोर्टाने नुकत्याच दिलेल्या 'पक्ष्यांनाही
मूलभूत हक्क असतात,' या स्वरूपाच्या
निकालाच्या विरोधात ही याचिका दाखल केली आहे.
०७) उत्तरप्रदेश
पाठोपाठ आता कोणत्या राज्यातील नेस्ले कंपनीच्या मॅगीचे उत्पादन होणाऱ्या
प्लान्टमधील नमुने, तसेच राज्यात
वितरीत झालेले काही नमुने अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयोगशाळेत
तपासणीसाठी पाठविले आहेत?
== उत्तराखंड
(पंतनगर प्लान्टमधील) http://yogeshp.com
=>उत्तर
प्रदेशमध्ये अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना मॅगीच्या उत्पादनात मोनो सोडियम
ग्लुटामेट, तसेच शिसे यांचे प्रमाण
अधिक आढळून आल्याने 'मॅगी' वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
=> नेस्ले इंडिया
कंपनीने फेब्रुवारी २०१४पूर्वी बनवलेल्या मॅगी नूडल्स बाजारातून हटवण्याचे आदेश
उत्तर प्रदेश अन्न सुरक्षा व औषध प्रशासनाने दिले आहेत.
०८) लष्करातील निवृत्त
जवान, कर्मचारी यांच्यासाठी
कोणती योजना लागू करण्याची मागणी केली जात आहे?
== समान श्रेणी,
समान पेन्शन' (वन रँक, वन पेन्शन)
>मागणी नेमकी काय?
भारतीय लष्करातून
निवृत्त झालेल्या सुमारे २० लाख कर्मचाऱ्यांची ही दीर्घ काळची मागणी आहे. समान
श्रेणीवर असताना व समान सेवाकालावधी पूर्ण करून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना
समान पेन्शन मिळावे. कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या तारखेचा त्यात विचार करू नये,
अशी निवृत्त कर्मचाऱ्यांची भूमिका आहे.
०९) सेवाकर वाढ:-
०१ जून २०१५
=>सेवाकराच्या दरात
१२.३६ टक्क्यांवरून १४ टक्के इतकी वाढ
=>रेल्वेचा
प्रथमवर्ग आणि वातानुकूलित डब्यांचे शुल्क वाढले असून, मालवाहतूकही महागली आहे. ही वाढ ०.५ टक्के आहे. रेल्वेच्या
एसी, प्रथम वर्ग आणि
मालवाहतुकीवर सध्या ३.७ टक्के सेवाकर आकारला जातो. तो आता ४.२ टक्के झाला आहे.
त्यामुळे ही वाढ ०.५ टक्के आहे.
पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचे पुढील नियोजित दौरे
== फिलिस्तीन,
जॉर्डन आणि इस्त्राइल http://yogeshp.com
=>इस्त्राइलचा दौरा
करणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान असतील.
=>२००३ मध्ये
इस्त्राइलचे तत्कालीन पंतप्रधान एरिअल शेरॉन भारत दौऱ्यावर आले होते. भारताच्या
दौऱ्यावर येणारे पहिले इस्त्राइली पंतप्रधान होते.
चेहरा ओळखणारे
तंत्रज्ञान असलेले ऑटोमेटेड टेलर मशिन (एटीएम) विकसित करण्यात कोणत्या देशामधील
शास्त्रज्ञांना यश आले आहे?
== चीन
=>त्सिंघुआ
विद्यापीठ आणि पूर्व चीनच्या झेजिअँग प्रांतातील त्झेक्वान टेक्नॉलॉजी या दोन
संस्थांतील शास्त्रज्ञांनी हे तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्झेक्वान टेक्नॉलॉजी
ही संस्था आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थांना सुरक्षा पुरवण्याचे काम करते.
=>चिली, कोलंबिया यांसारख्या काही देशांत एटीएममधून
पैसे काढण्यासाठी बोटाचे ठसे द्यावे लागतात. ते जुळले तरच पैसे काढता येतात.
अमेरिकेसारखे अनेक देश गुप्तता, तसेच अधिक
खर्चाच्या कारणामुळे हे तंत्रज्ञान वापरत नाहीत.
१२) 'काळा पैसा (अघोषित परकीय उत्पन्न व संपत्ती)
विधेयक २०१५'ला राष्ट्रपती
प्रणव मुखर्जी यांनी मंजुरी दिली असून, कधी पासून हा कायदा अंमलात येणार आहे?
== १ एप्रिल २०१६
=>अघोषित परकीय
उत्पन्न आणि संपत्तीच्या समस्येचा मुकाबला करण्यासाठी आणलेले हे विधेयक १३ मे रोजी
राज्यसभेत मंजूर करण्यात आले होते. त्यापूर्वी दोन दिवस लोकसभेने हे विधेयक संमत
केले होते.
थोडक्यात:-
=>माहिती न
देणाऱ्यास कमीत कमी ५० हजार रुपये व जास्तीत जास्त दोन लाख रुपये दंड ठोठावण्यात
येईल. http://yogeshp.com
=>कर
अधिकाऱ्यांकडून कोणत्याही व्यक्तीला विदेशात काळा पैसा जमा असल्याच्या संशयावरून
समन्स, नोटीस हे पोस्ट किंवा कुरिअर
सेवा किंवा ई-मेल, फॅक्स अशा
स्वरूपात पाठविण्यात येईल.
=>हे विधेयक लागू
होण्यापूर्वी नागरिकांना विदेशात असलेली अघोषित संपत्तीबाबत खुलासा करण्यासाठी
अल्पावधी देण्यात येईल. या कालावधीत ते ३० टक्के कर आणि ३० टक्के दंड भरून
संपत्तीबाबतची स्थिती स्पष्ट करू शकतात.
दरवर्षी अवघे १२
रुपये देऊन दोन लाख रुपयांचा अपघात विमा देणाऱ्या 'प्रधानमंत्री बीमा सुरक्षा योजना' ही सामजिक सुरक्षा योजना खाजगी क्षेत्रातील कोणत्या
कंपन्यांनी स्वीकारली आहे?
== आयसीआयसीआय
लॉम्बार्ड, बजाज अलियान्झ, रिलायन्स जनरल, युनिव्हर्सल सॉम्पो, इफ्को टोकियो आणि फ्युचर जनराली
इन्कम टॅक्स
रिटर्न भरण्यासाठी केंद्र सरकारने नवा अर्ज जारी केला असून त्यामुळे आता नवीन
प्रक्रियेमध्ये करदात्यांना कोणते अर्ज भरायचे आहेत?
== 'आयटीआय २'
, 'आयटीआर २ ए' आणि आयटीआर ४ एस
=>काय वगळले?
परदेशी प्रवासाचा
तपशील
पडीक खात्यांची
माहिती
व्यवहारातील
खात्यातील शिल्लक रक्कम
=>काय माहिती
द्यायची?
आयएफसी कोडसह
व्यवहारातील चालू वा बचत खात्यांची माहिती
पासपोर्ट क्रमांक
(असल्यास)
आय-लीग फुटबॉल
स्पर्धेचे प्रथमच विजेतेपद कोणत्या संघाने पटकावले?
== मोहन बागान क्लब
*आय-लीगमधील
विजेते
२००७-०८ डेम्पो
क्लब
२००८-०९ चर्चिल
ब्रदर्स
२००९-१० डेम्पो
क्लब
२०१०-११ साळगावकर
क्लब http://yogeshp.com
२०११-१२ डेम्पो
क्लब
२०१२-१३ चर्चिल
ब्रदर्स
२०१३-१४ बेंगळुरू
क्लब
टर्की येथे सुरु
असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत
भारताची आघाडीची तिरंदाज दीपिका कुमारीने कोरियाच्या कोणत्या खेळाडूला सरळ
सेटमध्ये नमवून वर्ल्डकपमधील महिलांच्या वैयक्तिक रिकर्व्ह प्रकारात ब्राँझपदकाची
कमाई केली?
== चांग हे जिन
आयआयटी
मद्रासच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी आंबेडकर-पेरियार स्टुडंट सर्कल (एपीएससी)
नामक फोरमची स्थापना कधी केली होती ?
== १४ एप्रिल २०१४
रोजी
कोलकाताहून
अगलतला, व्हाया बांगलादेश बस सेवा
कधीपासून सुरु करण्यात येणार आहे?
== ०१ जून २०१५ http://yogeshp.com
राष्ट्रकुल
क्रीडा स्पर्धा घोटाळ्यातील आरोपी सुरेश कलमाडी यांचे निकटवर्तीय असलेल्या कोणत्या
व्यक्तीची एशियन अॅथलेटिक्स असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे?
== ललित भनोत
१९७१च्या
स्वातंत्र्य युद्धात पाठिंबा दिल्याबद्दल बांगलादेश कोणत्या माजी
पंतप्रधानांचा गौरव करणार आहे? http://yogeshp.com
== अटलबिहारी
वाजपेयी
No comments:
Post a Comment