*आजचा प्रथम आंतरराष्ट्रीय योगदिनाची नोंद गिनीज बुकात २१ जून २०१५
ज्येष्ठ इतिहास संशोधक, लेखक आणि व्याख्याते निनाद बेडेकर यांचे पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले.
*.निनाद बेडेकर हे इतिहास संशोधन क्षेत्रातील नावाजलेले व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या संशोधनातून पानीपतचा प्रत्यक्ष इतिहास जगासमोर आणला. http://yogeshp.com
*.शिवाजी महाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी अशा अनेक पैलूंपैकी प्रत्येकाचा स्वतंत्रपणे विचार करून त्यांनी त्यावर लिखाण केले होते.
*.देशातील ग्राहक चळवळीचे प्रणेते बिंदुमाधव जोशी यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते.
*.त्यांना सरकारकडून "फादर ऑफ कंझ्युमर मूव्हमेंट ऑफ इंडिया' असे संबोधून गौरविण्यात आले होते.
*.त्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळेच 1986 साली ग्राहक संरक्षण कायदा संमत करण्यात आला.
*.त्यांच्याच प्रयत्नांमुळे स्वतंत्र ग्राहक प्राधिकरण आणि ग्राहक कल्याणकारी विभागाची स्थापना झाली.
*.जनधन योजनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 मे रोजी सामाजिक सुरक्षा विमा आणि निवृत्तीवेतन योजनेचे अनावरण कोलकाता येथे केले. http://yogeshp.com
*.1 जूनपासून विमा संरक्षण देण्यासप्रारंभ झाला
*.प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेंशन योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना या तीन योजनांचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
*.या योजनांचा राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई विद्यापिठाच्या पदवीदान सभागृहात शुभारंभ झाला.
*.जिल्ह्यातील अग्रणी बॅंकांच्या माध्यमातून या योजना राबवायच्या आहेत.
*.स्वच्छ भारत अभियानासंदर्भात नवी दिल्ली येथे नीती आयोगामध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपगटाची पहिली बैठक झाली.
*.पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली8 फेब्रुवारी 2015 रोजी नीती आयोगाच्या बैठकीत या उपगटाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानुसार 9 मार्च 2015 रोजी या उपगटाची स्थापना करण्यात आली.
*.या उपगटामध्ये महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, कर्नाटक, बिहार, दिल्ली, हरयाणा, मिझोराम, सिक्कीम, पश्चिम बंगाल व उत्तराखंडचा समावेश आहे.
*.आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू या उपगटाचे निमंत्रक असून त्यांनी या बैठकीचे आयोजन केले.
*.आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रसायन शास्रज्ञ आणि देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित झालेले भारतरत्न डॉ. सी. एन. राव यांना जपान सरकारनेही सर्वोच्च नागरी http://yogeshp.comपुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे.
*.विज्ञान क्षेत्रातील भरीव योगदान आणि भारत - जपानमधील माहिती आणि विज्ञान क्षेत्रात मोलाचे योगदान दिल्याबद्दल डॉ. राव यांना हा पुस्कार देण्यात येणार आहे.
*.जपानचा 'ऑर्डर ऑफ द रायझिंग सन, गोल्ड अॅण्ड सिल्व्हर स्टार' हा पुरस्कार जपान सरकारतर्फे डॉ. राव यांना देण्यात येणार.
*.राव यांनी पंतप्रधानांचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणूनही काम केले आहे.
*.संसदेच्या लोकलेखा कमिटी अर्थात पीएसीच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. व्ही. थॉमस यांची रविवारी फेरनियुक्ती करण्यात आली.
*.थॉमस यांना एप्रिल 2016 पर्यंत पीएसी अध्यक्षपदी पुन्हा नियुक्त करण्यात आले आहे.
*.महत्त्वाच्या वित्त कमिट्यांमध्ये पीएसी ही सर्वांत महत्त्वाची कमिटी मानली जाते.
*.1967 पासून या कमिटीच्या अध्यक्षपदी मुख्य विरोधी पक्षातील सर्वांत ज्येष्ठ सदस्याची नियुक्ती करण्याचा पायंडा आहे.
*.महालेखापाल अर्थात कॅगचा अहवाल संसदेत सादर झाल्यानंतर लोकलेखा समिती त्या अहवालांची चौकशी करते.
*.या समितीचे दरवर्षी गठन केले जाते.
*.लोकलेखा समितीत अधिकाधिक 22 सदस्य असतात. यामध्ये 15 लोकसभेचे आणि 7हून अधिक राज्यसभेचे असू शकत नाहीत. समितीच्या सदस्यपदी लोकसभेच्या सदस्यांची निवड होते, तर राज्यसभेचे प्रतिनिधी नियुक्त केले जातात.
*.मंत्र्यांचा या समितीत समावेश असू शकत नाही.
*.21 जून या दिवशी जागतिक योग दिन साजरा होणार आहे. याच धर्तीवर आता‘जागतिक आयुर्वेद दिना’साठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे.
*.भारत आणि बांगलादेश यांच्यातील काही वस्त्या आणि भूभागाचे आदानप्रदान करण्याला मुभा देणाऱ्या ऐतिहासिक घटनादुरुस्ती विधेयकाला संसदेने सर्वसंमतीने मंजुरी दिली.
*.यामुळे बांगलादेशातील सुमारे 510 एकर जमीन भारताला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
*.सीमा विधेयकाच्या रूपाने संसदेने 119 व्या घटनादुरुस्ती विधेयकावर मंजुरीची मोहोर उमटवली.
*.राज्यसभेने सर्वसंमतीने मंजुरी दिल्यानंतर गुरुवारी लोकसभेने तोच मार्ग अनुसरला.
*.केंद्र सरकारकडे ‘स्मार्ट गाव’ योजना सुरू करण्याची कोणतीही योजना नाही; मात्र राज्यांना अशा प्रकारचा उपक्रम राबवायचा असल्याने ते ‘स्मार्ट गाव’ योजना सुरू करू शकतात. http://yogeshp.com
*.जमिनीवरून हवेत मारा करणारे http://yogeshp.com ध्वनीच्या गतीपेक्षा जास्त वेग असलेले(सुपरसॉनिक) आकाश हे क्षेपणास्त्र मंगळवारी लष्कराच्या सेवेत रुजू झाले. या प्रकल्पाचे काम सुरू होऊन तीन दशकांपेक्षा अधिक काळ लोटल्यानंतर ‘आकाश’ला रीतसर लष्करात समाविष्ट करण्यात आले.
*.वैशिष्ट्ये
> 96 टक्के स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे ‘आकाश’ची निर्मिती.
> जमिनीवरून हवेत 25 कि.मी. अंतर आणि 20 कि.मी. उंचीवरील अनेक लक्ष्ये एकाच वेळी अचूक भेदण्याची क्षमता.
> प्रतिकूल वातावरणातही शत्रूची विमाने, हेलिकॉप्टर आणि मानवरहित विमानांना पाडण्यास सक्षम.
> शंभरावर क्षेपणास्त्रांच्या समावेशासाठी 19500 कोटी रुपये खर्च. पहिली पूर्ण रेजिमेंट जून-जुलैपर्यंत सज्ज. दुसरी रेजिमेंट 2016 च्या अखेरीस पूर्णत्वास.
> यापूर्वीच हवाई दलात समावेश. लष्करासाठी यंत्रणेत आवृत्तीत बदल. स्वयंचलित यंत्रणा. आवश्यकतेनुसार वाहनावर ठेवूनही वापरता येणार.
> डीआरडीओने 1984 मध्ये सुरू केलेल्या http://yogeshp.comएकात्म क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत विकसित पाच कोटी क्षेपणास्त्र यंत्रणांमध्ये ‘आकाश’चा समावेश.
*.गुजरातमधील सासन गीर अभयारण्यातील आशियाई सिंहांच्या संख्येमध्ये वाढ झाली असून, ती आता 523 वर पोचली आहे.
*.योगासाठीचे प्रमुख केंद्र मानले जाणाऱ्या म्हैसूर शहरात आंतरराष्ट्रीय योगा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment